भारतीय टपाल विभागाने अमेरिकेसाठी टपाल बुकिंग स्थगित करण्याची घोषणा केली
भारतीय टपाल विभागाने अमेरिकेसाठी टपाल बुकिंग स्थगित करण्याची घोषणा केली
दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसच्या अनुक्रमे, भारतीय टपाल विभागाने सद्य स्थितीचे पुनरावलोकन करुन अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या टपाल सेवेची बुकिंग स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यूएसकडे जाणाऱ्या टपालाच्या वाहतुकीतील सततच्या अडचणी आणि नियामक यंत्रणांचे अभाव लक्षात घेता, पत्रे, दस्तऐवज व USD 100 पर्यंतच्या मूल्याच्या भेटवस्तू यांसह सर्व प्रकारच्या अमेरिकेसाठी टपाल बुकिंग पूर्णपणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टपाल विभाग या परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवून असून, सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या ग्राहकांनी आधीच बुकिंग केली असेल, पण त्यांच्या वस्तू पाठवता आल्या नाहीत, त्यांना टपाल शुल्काची परतफेड मिळू शकते.
ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल टपाल विभाग क्षमस्व आहे.
***
यश राणे/ राज दळेकर / परशुराम कोर
***