प्रसिद्धी पत्रक
प्रसिद्धी पत्रक
गणेश उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र टपाल मंडळाने पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव यांनी डिझाइन केलेली 2 चित्र पोस्टकार्ड 30.08.2025 रोजी जीएसबी सेवा मंडळ इथे प्रकाशित केली.
मुंबई जीपीओच्या संचालक रेखा रिझवी यांनी चित्र असलेले विशेष पोस्टकार्ड प्रकाशित केले आणि पहिला अल्बम जीएसबी सेवा मंडळाचे विश्वस्त आणि अध्यक्ष आर. जी. भट यांना सुपूर्द केला.
या प्रसंगी सहाय्यक पोस्टमास्टर जनरल (बीडी) – डॉ. सुधीर जाखेरे, सहाय्यक संचालक (पीएसआर) – यादगिरी न्यालपेल्ली, सहाय्यक संचालक श्यामला श्रीनिवासन, एएसपी (फिलाटेली) – मधुकर गवारी, जीएसबी सेवा मंडळाचे संयोजक डॉ. भुजंग पै, श्रीदेवी शेणॉय आणि तिकीट संग्राहक अश्विनी मंजुरे उपस्थित होते.
***
निलीमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***