Current Affairs

निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा

निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा

 

 

अनुक्रमांक

 करार/सामंजस्य करार

1.

मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे.

2.

भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध केलेल्या LoC वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करणे.

3.

भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (IMFTA) वाटाघाटींचा शुभारंभ.

4.

भारत-मालदीव राजनैतिक संबंध स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणे.

 

अनुक्रमांक

उद्घाटन / हस्तांतरण

1.

भारताच्या बायर्स क्रेडिट (खरेदीदार कर्ज योजना) सुविधेअंतर्गत हुलहुमाले येथे 3,300 सामाजिक घरकुलांचे हस्तांतरण.

2.

अड्डू शहरातील रस्ते आणि सांडपाणी-मलनिस्सारण प्रणाली प्रकल्पाचे उद्घाटन.

3.

मालदीवमध्ये 6 उच्च प्रभावी सामुदायिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन.

4.

72 वाहने आणि अन्य उपकरणे यांचे हस्तांतरण.

5.

दोन भीष्म हेल्थ क्यूब या फिरत्या आरोग्य तपासणी यंत्रांच्या संचांचे हस्तांतरण.

6.

माले येथील संरक्षण मंत्रालय इमारतीचे उद्घाटन.

 

 

अनुक्रमांक

 सामंजस्य करारांचे आदानप्रदान

मालदीवचे प्रतिनिधी

भारताचे प्रतिनिधी

1.

मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांच्या कर्ज मर्यादेसाठी करार

श्री. मूसा जमीर, वित्त आणि नियोजन मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

2.

भारत सरकारकडून दिलेल्या कर्ज मर्यादे वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करण्याबाबतचा सुधारीत करार

श्री. मूसा जमीर, वित्त आणि नियोजन मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

3.

भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (FTA) साठी संदर्भ अटी

श्री. मोहम्मद सईद, आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

4.

मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार

श्री. अहमद शियाम, मत्स्य व्यवसाय आणि सागरी साधनसंपत्ती मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

5.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि मालदीवचे हवामान सेवा (MMS), पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार

श्री. थोरीक इब्राहीम, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

6.

डिजिटल रूपांतरणासाठी व्यापक स्तरावर यशस्वी अंमलबजावणी केलेल्या डिजिटल उपाययोजना देऊ करण्याच्या सहकार्यासाठी (भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि मालदीवचे गृहसुरक्षा आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

श्री. अली इहुसान, गृहसुरक्षा आणि तंत्रज्ञान मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

7.

मालदीवकडून भारतीय फार्माकोपिया अर्थात औषधसंहितेला मान्यता देण्यासाठी सामंजस्य करार

श्री. अब्दुल्ला नझीम इब्राहीम, आरोग्य मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

8.

भारताच्या NPCI International Payment Limited (NIPL) आणि मालदीवच्या Monetary Authority (MMA) यांच्यात, मालदीवमध्ये UPI च्या वापराबाबत नेटवर्क-टू-नेटवर्क (दोन प्रणालींमधील समन्वय) करार

डॉ. अब्दुल्ला खलील, परराष्ट्र मंत्री

डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

 

 

***

निखिल देशमुख/आशुतोष सावे/परशुराम कोर

***