एलएसएएम 25 (यार्ड 135) या 11 व्या दारुगोळा तथा टॉरपेडो आणि क्षेपणास्त्र वाहक पडावाचे हस्तांतरण
एलएसएएम 25 (यार्ड 135) या 11 व्या दारुगोळा तथा टॉरपेडो आणि क्षेपणास्त्र वाहक पडावाचे हस्तांतरण
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
एलएसएएम 25 (यार्ड 135) या, 11 व्या एसीटीसीएम अर्थात दारुगोळा तथा टॉरपेडो आणि क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या पडावाचा हस्तांतरण समारंभ 08 सप्टेंबर 25 रोजी मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड,ठाणे येथे झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिअर ऍडमिरल विशाल बिश्नोई ACWP&A हे उपस्थित होते.
हा 11 वा दारुगोळा तथा टॉरपेडो आणि क्षेपणास्त्र वाहून नेण्याची व्यवस्था असलेला पडाव बांधण्यासाठी मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड, ठाणे, यांच्यासोबत 05 मार्च 21 रोजी करार करण्यात आला होता. या पडावांचे आरेखन आणि बांधणी स्वदेशी असून या जहाज कारखान्याने ती अनुक्रमे भारतीय जहाज आरेखन फर्म आणि इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे. सागरी योग्यतेसंदर्भात विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत (एनएसटीएल) मॉडेल चाचणी घेण्यात आली. या जहाज कारखान्याने आतापर्यंत दहा पडाव यशस्वीरित्या वितरित केले असून भारतीय नौदलाकडून परिचालन उत्क्रांतीसाठी त्यांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.
हे पडाव भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे अभिमानी ध्वजवाहक आहेत.
4COX.jpg)
H036.jpg)
E04E.jpg)
शैलेश पाटील/सोनली काकडे/प्रिती मालंडकर