Current Affairs

विदेश भवन, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

विदेश भवन, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

मुंबई, 21 जून 2025

 

विदेश भवन, मुंबई (प्रादेशिक पारपत्र कार्यालय , स्थलांतरितांचे संरक्षण कार्यालय , शाखा सचिवालय  आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा केला. अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, आयसीसीआरच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विविध देशांमधील (भूतान, म्यानमार, लाओस, रवांडा, श्रीलंका, फिजी बेटे, तुर्कमेनिस्तान इत्यादी) आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनीही मुंबईतील विदेश भवन येथे सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी सत्राचा आनंद घेतला आणि ते सहभागी होण्यास उत्सुक होते.

   

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाल्यानंतर, आयसीसीआरने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘चाय पे चर्चा’ साठी कार्यालयात आमंत्रित केले. मुंबईतील त्यांच्या एका वर्षाच्या प्रवासाची माहिती जाणून घेण्यासाठी  एक संवादात्मक सत्र यावेळी आयोजित करण्यात आले.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/H.Kulkarni/D.Rane