अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा केंद्रातर्फे 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हरित योग ट्रेक्सचे आयोजन
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा केंद्रातर्फे 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हरित योग ट्रेक्सचे आयोजन
पणजी, गोवा 17 जून 2025
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (AIIA) वतीने, “हरित योग मोहिम” अंतर्गत 15 जून रोजी गोव्यातील विविध प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळांवर योग ट्रेक्स करून 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक राज्यव्यापी, अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात संस्थेचे सर्व अध्यापक, विद्यार्थी, आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
या मोहिमेंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी व 30 प्राध्यापकांनी 12 गटांमध्ये विभागून 50 हून अधिक सांस्कृतिक व निसर्ग संपन्न स्थळांवर योगाभ्यास केला. या स्थळांमध्ये तलाव, धबधबे, गुहा, मंदिरे, किल्ले, चर्च, समुद्रकिनारे, शैक्षणिक संस्था आणि युनेस्को मान्यता प्राप्त वारसा स्थळाचा समावेश होता. या उपक्रमाने योगाभ्यास आणि निसर्ग यांचा समन्वय साधत पर्यावरण जागरूकता, आध्यात्मिक प्रगती आणि समुदाय आरोग्य यांचे सशक्तीकरण केले.
“योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या संकल्पनेवर आधारित योग व पर्यावरण जाणीवेच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
योगाभ्यास केलेली ठिकाणे:
तलाव, धबधबे व गुहा : मये तलाव, हरवळेम धबधबा, केसारवल धबधबा, नेत्रावळी धबधबा, पांडव गुहा, सेंट जॅसिंटो बेट, रिवोना बौद्ध गुहा, बबल लेक.
वारसा स्थळे : चापोरा किल्ला, आग्वाडा किल्ला, बॉमजीसस बॅसिलिका, ओल्ड गोवा चर्चेस, सेंट बार्थोलोम्यू चर्च, बिग फूटलुटोलिम, रीसमॅगोस किल्ला, वेरम, जपानी गार्डन वास्को, फार्मागुडी येथील शिवाजीमहाराज पुतळा, थ्री किंग्स चर्च, मडेर कॅन्सोलीम, पद्मभूषण मनोहर पर्रीकर सभागृह, तपोलोक योगक्षेत्र, योगसेतू, परशुराम पुतळा, फोंटेनहास (युनेस्को वारसा स्थळ), पणजी चर्च ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन.
मंदिरे: श्री. म्हाळसा नारायणी मंदिर, श्री. सप्तकोटेश्वर मंदिर, श्री.शांतादुर्गा मंदिर (सांकोळेव कवळे), श्री.कामाक्षीमंदिर, श्री.चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, श्री. मंगेशीमंदिर, भूतवाडी (पेडणे), श्री.बोडगेश्वर मंदिर (म्हापसा), श्री.लक्ष्मीनरसिंह मंदिर, श्री.धारेश्वर महादेव मंदिर, श्री. महालक्ष्मी मंदिर (बांदोडा), तांबडी सुरळा, श्री.रुद्रेश्वर, बिर्लामंदिर, चांदोर शिवमंदिर, रामनाथ दामोद रसंस्थान, श्री. विमलेश्वरमंदिर.
समुद्र किनारे व नैसर्गिक स्थळे: अंजुना, वागाटोर, मिरामार, दोनापावला पॉइंट.
सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था: गोवा विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, फोंटेनहास वारसा स्थळ.
मुख्यक्रिया:
• सूर्य नमस्कार व कॉमन योगा प्रोटोकॉलसह योगाभ्यास
• अनुलोम–विलोम, भ्रमरी व भस्त्रिका यांसारखी प्राणायाम तंत्रे
• ध्यान सत्रे व निसर्ग ट्रेक्स – मानसिक स्थैर्यासाठी
पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही विविध ठिकाणी सहभाग नोंदवत योगाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत प्रचंड उत्साह दाखवला.
या हरित योग ट्रेक्स उपक्रमा मध्ये योग, पर्यावरण व सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर मेळ घडवला. या उपक्रमातून लोकांना योग जीवनशैली म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोव्याच्या डीन प्रा. डॉ. सुजाता कदम आणि सहायक डीन प्रा . डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शना अंतर्गत या उपक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आले. डॉ. संजय खेडेकर, हे या उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत.
NM/PM