Current Affairs

भारत 6 डिसेंबरपासून चंदीगड येथे चार दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF 2025) चे आयोजन करणार

भारत 6 डिसेंबरपासून चंदीगड येथे चार दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF 2025) चे आयोजन करणार

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी व प्रशिक्षण, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी  6 ते 9 डिसेंबर 2025  दरम्यान चंदीगड येथे होणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ) च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

29  सप्टेंबर 2025  रोजी झालेल्या मागील आढावा बैठकीतील चर्चेला  पुढे नेत , डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की यावर्षीचा IISF हा भारताच्या विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील दृष्टिकोनात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मूलभूत परिवर्तनाचे प्रभावी राष्ट्रीय चित्रण सादर करेल.

आज विज्ञान हे धोरणांना दिशा देत आहे. एक काळ होता जेव्हा विज्ञान क्षेत्र धोरणांची वाट पाहत असे; आज धोरणं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे घडवली जातात,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विज्ञान-आधारित सुशासनाकडे निर्णायक पावले टाकत आहे, यावर भर दिला.

मंत्र्यांनी नमूद केले की सरकार आता नियंत्रक न राहता सुविधादाता (facilitator) बनले आहे. सरकारने अनुकूल परिसंस्था  निर्माण केली आहे, जिथे खासगी क्षेत्र, स्टार्टअप्स आणि तरुण नवोन्मेषक हे डीप टेक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांतील नवकल्पनांना गती देत आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की हा कार्यक्रम भारताच्या विविध मंत्रालये, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअप्स यांच्या माध्यमातून साध्य झालेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान  प्रगतीचा उत्सव साजरा करेल आणि तसेच हा उत्सव आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक असेल.

मंत्र्यांनी नमूद केले की यावर्षीचा IISF हा भारताच्या त्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामगिरीचे प्रदर्शन करेल, जी आता राष्ट्रीय आत्मनिर्भरतेचे आधारस्तंभ बनली आहेत. त्यांनी सांगितले की IISF 2025 हे केवळ वैज्ञानिक आदानप्रदानाचे व्यासपीठ ठरणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेचा उत्सव म्हणूनही साजरा केला जाईल.***

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

अभ्यागत कक्ष : 38