भारताने पॅरिस कराराच्या आराखड्याशी व वातावरण महत्त्वाकांक्षेच्या वर्धनासाठी परस्पर संवाद आधारित दृष्टिकोनाशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला आहे
भारताने पॅरिस कराराच्या आराखड्याशी व वातावरण महत्त्वाकांक्षेच्या वर्धनासाठी परस्पर संवाद आधारित दृष्टिकोनाशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला आहे
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
13 ऑक्टोबर रोजी ब्राझीलिया येथे झालेल्या प्री-कॉप30 बैठकीदरम्यान जागतिक स्टॉक टेक (GST) ब्रेकआउट सत्राला संबोधित करताना, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी पहिल्या GST ची यशस्वी सांगता झाल्याचे मान्य केले तसेच पॅरिस कराराची गंभीरपणे अंमलबजावणी होत असल्याचे हे एक महत्त्वपूर्ण द्योतक आहे असे ते पुढे म्हणाले .
पॅरिस कराराच्या उद्दिष्टांप्रति जगाच्या सामूहिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी जीएसटी ही पाच वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. जीएसटीची रचना तीन आवश्यक कार्ये करून महत्त्वाकांक्षा बळकट करण्यासाठी केली आहे असे यादव यांनी अधोरेखित केले. ही कार्ये पुढीलप्रमाणे – देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर सर्व संबंधित संस्थांना त्यांच्या सामूहिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यास प्रोत्साहित करणे, उणिवा ओळखण्यास सक्षम करणे आणि सुधारित कृतींचे मार्गदर्शन करणे .
अशा प्रकारे या कराराची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देणारी व्यवस्था या नात्याने जीएसटी काम करते , त्यामुळे राजकीय पाठिंबा मिळवणे व उच्च महत्वाकांक्षेची पूर्ती करण्यासाठी योग्य प्रयत्नांना पाठबळ मिळवणे सोपे होते. परस्पर संवादादरम्यान या पैलूंवर भर दिल्यामुळे जीएसटी उद्दिष्टांच्या माहितीमुळे प्रेरित झालेले आंतरराष्ट्रीय सहकार्य व देशांतर्गत हवामान कृती अमलात आणण्यासाठी मदत होईल, असे मंत्रीमहोदय म्हणाले.
यापुढे भविष्यकाळात जीएसटी मध्ये कोणतेही वैज्ञानिक मूल्यमापन त्याच्या जागतिक परिणामांवर योग्य ती चर्चा झाल्याशिवाय घाईने समाविष्ट केले जाऊ नये असे मंत्र्यांनी प्रस्तावित केले. विज्ञानाने अचूकता व पुराव्यांच्या भक्कम पायावर आधारित तसेच सर्व संबंधित स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढे चालले पाहिजे असे ते म्हणाले.
“आपण आता महत्वाकांक्षी हवामान उपाययोजना राबविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याहूनही महत्वाचे म्हणजे , विकसनशील देशांना योग्य साधनसंपत्ती पुरवून या उपाययोजनांसाठी त्यांच्याकडून सहकार्य मिळवणे आवश्यक आहे.” असे ते पुढे म्हणाले. प्रत्यक्ष कृतीविना केवळ सतत आढावा घेत राहण्याची वेळ आता निघून गेली आहे हे त्यांनी अधोरेखित केले. “संवाद महत्वाची आहेच, पण कृती देखील सर्वात महत्वाची आहे” ते म्हणाले.
आशिष सांगले/उमा रायकर / प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai