पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला मार्गस्थ
पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला मार्गस्थ
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे रवाना झाले आहेत. या राज्यातील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे :
“पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जात आहे. या कठीण समयी संकटात असलेल्या सर्वांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे आहे”
Leaving for Himachal Pradesh and Punjab to review the situation in the wake of floods and landslides. The Government of India stands shoulder to shoulder with those affected in this tragic hour.
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर