Current Affairs

परमवीर चक्र पुरस्कार विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों यांना आदरांजली म्हणून पुणे येथील हवाई दल तळ येथे 2 नोव्हेंबर 2025 रोजी पहिल्या सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉनचे केले आयोजन

परमवीर चक्र पुरस्कार विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों यांना आदरांजली म्हणून पुणे येथील हवाई दल तळ येथे 2 नोव्हेंबर 2025 रोजी पहिल्या सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉनचे केले आयोजन

 

पुणे, रविवार, 2 नोव्हेंबर 2025

पुणे स्थित हवाई  दल तळ येथे परमवीर चक्र पुरस्कार विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों यांच्या शौर्य आणि वारशाचे स्मरण करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2025 रोजी सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉनची पहिली आवृत्ती आयोजित केली होती. ही मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली. ही मॅरेथॉन स्वतः एक जागरूक खेळाडू असलेल्या भारतीय हवाई दलाच्या एकमेव परमवीर चक्र पुरस्कार विजेते सेखों यांना उचित आदरांजली होती. या कार्यक्रमात 3,500 हून अधिक हवाई दल योद्धे, त्यांचे कुटुंबिय, शालेय विद्यार्थी आणि पुण्यातील नागरिकांनी भाग घेतला. या मॅरेथॉनला वायू सेना पदक विजेते, पुणे हवाई दल तळएअर ऑफिसर कमांडिंग, एअर कॉमोडोर सतबीर सिंग राय यांनी सकाळी 05. 45 वाजता स्टेशन स्पोर्ट्स ग्राउंड येथून हिरवा झेंडा दाखवला. मॅरेथॉनमध्ये  धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

स्टेशन स्पोर्ट्स ग्राउंडवर पारितोषिक वितरणाने या कार्यक्रमाची  सकाळी 9.30 वाजता सांगता झाली. एअर ऑफिसर कमांडिंग यांनी प्रत्येकासाठी, विशेषतः लष्करी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन जीवनात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या चपळ राहण्यासाठी सर्वांना व्यायामाचे वेळापत्रक तयार करण्याचे आणि त्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

***

सुषमा काणे/संदेश नाईक/परशुराम कोर

*** 

Visitor Counter : 88