Current Affairs

केंद्रीय संचार ब्‍युरोच्या वतीने योग दिंडीचे आयोजन

केंद्रीय संचार ब्‍युरोच्या वतीने योग दिंडीचे आयोजन

सोलापूर, 18 जून 2025

भारतीय योगाची माहिती व जाणीव जागृती व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि योग दिवस समन्वय समिती, सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने आज सकाळी 7.00 वाजता ह.भ.प. आप्पाराव बचुटे उद्यान, दमाणी नगर, सोलापूर येथे योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे आणि सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांच्या हस्ते योग दिंडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. योग दिंडीची सुरुवात आप्पाराव बचुटे उद्यान येथून पावन गणपती- लक्ष्मी नगर- गंगा नगर-जगताप हॉस्पिटल-मरीआई चौक-सन सिटी रोड मार्गे परत  येऊन आप्पाराव बचुटे उद्यान येथे समारोप करण्यात आला. दिंडीमध्ये योग समन्‍वयक मनमोहन भुतडा, दत्तात्रय चिवडशट्टी, रोहिणी उपळाईकर, जीवन कुमार आवताडे, जितेंद्र महामुनी, अशोक गरड, रघुनंदन भुतडा, सतीश घोडके, जे एम हन्नुरे आणि योग संस्थेचे पदाधिकारी, लहान मुले, युवक आणि नागरिक सहभागी  झाले होते.

AY/PM