कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, देशवासियांना कारगिल विजय दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
हा दिवस भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अद्वितीय शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देतो, ज्यांनी राष्ट्राच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे मातृभूमीवरचे प्रेम आणि बलिदान प्रत्येक पिढीसाठी सदैव प्रेरणादायक ठरेल.
जय हिंद!
देशवासियों को कारगिल विजय दिवस की ढेरों शुभकामनाएं। यह अवसर हमें मां भारती के उन वीर सपूतों के अप्रतिम साहस और शौर्य का स्मरण कराता है, जिन्होंने देश के आत्मसम्मान की रक्षा के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। मातृभूमि के लिए मर-मिटने का उनका जज्बा हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा। जय…
***
निखिल देशमुख/राज दळेकर/परशुराम कोर